पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची मनमोहक आरास

सोलापूर :- पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ७२ व्या प्रजासत्ताकदिनाच्या (72nd Republic Day) निमित्ताने आकर्षक फुलांची मनमोहक आरास करण्यात आली आहे. तीन रंगांच्या फुलांचा वापर करीत तिरंगा साकारण्यात आला असल्याने मंदिर खुलून दिसत आहे.

आज २६ जानेवारी, ७२ वा भारतीय प्रजासत्ताकदिन संपूर्ण भारतभर साजरा केला जात आहे. याच प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक फुलांची तिरंगा रूपी सजावट करण्यात आली आहे. याकरिता झेंडू, शेवंती, कामिनी या तीन प्रकारच्या व तीन रंगांच्या १५० किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे. सदर फुलांची आरास पुणे येथील भाविक सचिन चव्हाण, संदीप पोकळे, प्रकाश पोकळे यांनी केली आहे. तर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साई डेकोरेशनचे शिंदे ब्रदर्स पंढरपूर यांनी केले आहे.

२६ जानेवारीनिमित्त शासकीय सुटी  असल्याने विठ्ठलदर्शनासाठी मोठ्या  संख्येने भाविक येत आहेत. मुखदर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना मंदिरात फुलाच्या सुंदर आराशीचे मनमोहन दर्शन घडत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER