अदनान सामीने असे केल 230 किलोवरून 75 किलो वजन

मूळचा पाकिस्तानी पण आता भारतीय नागरिक असलेल्या गायक अदनान सामी त्याच्या कीबोर्ड वादनासोबतच त्याच्या वजनाबाबतही प्रचंड चर्चेत होता. मात्र अत्यंत कष्टपूर्वक अदनानने त्याचे वजन कमी केेले. आज त्याच्याकडे बघताना कधी काळी हा 230 किलोचा होता यावर विश्वासही बसणार नाही. या गोष्टीची आज आठवण येण्याचे कारण म्हणजे अदनानने (Adnan Sami) एका फॅनच्या ट्विटला दिलेले उत्तर. यात अदनाने त्याचे वजन का आणि कसे वाढले आणि नंतर त्याने ते कसे कमी केले हे सांगितले आहे.

ट्विटवर अदनानच्या एका फॅनने अदनानच्या पत्नीने बनवलेल्या निहारीच्या (निहारी हा एक अत्यंत लोकप्रिय असा मांसाहारी पदार्थ आहे.) फोटोवर प्रतिक्रिया देताना यात खूपच तरी, तेल आहे. हे निहारीप्रमाणे दिसत नाही. पण तुम्ही याला निहारी म्हणण्यास स्वतंत्र आहात. ही तुमची आवड आहे. यावर प्रतिक्रिया देताना अदनाने स्वतःचे दोन फोटो शेअर केले आणि म्हटले आहे, ‘खरे? तू या जाड्या व्यक्तीला बघतोयस का? हा मी आहे. मी अजवाईन खाऊन असा झालेलो नव्हतो तर जास्त खाऊन असा झालो होतो. खाण्याच्या बाबतीत माझ्याशी वाद घालू नकोस. खाण्यावर मी खूप संशोधन केलेले आहे आणि खूप खाल्लेलेही आहे. निहारीत खूप तूप असते.’

आणकी एका फॅनला उत्तर देताना अदनाने सांगितले, चपाती, भात , बटाटे, साखर अशा कार्बोहाइड्रेटने माझे वजन वाढवण्यास मदत केली होती. पण मला माझ्या वाढलेल्या वजनाने गंभीर इशारा दिल्यानंतर केवळ 16 महिन्यात मी माझे वजन कमी केले. यासाठठटी मी सक्तीने डाएटिंग आणि व्यायाम करीत होते. त्यामुळेच माझे वजन 230 किलोवरून 75 किलोवर आले आहे.

खरे तर एखाद्या जाड्या व्यक्तीला त्याचे वजन कमी करायचे असेल तर त्याने अदनान सामीचा किस्सा गिरवायला हरकत नाही. एखाद्याने मनावर घेतले की तो ते प्राप्त केल्याशिवाय राहात नाही याचे चांगले उदाहरण म्हणजे अदनान सामी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER