पराभव मान्य करा, डोनाल्ड ट्रम्प यांना पत्नीचा सल्ला

Donald Trump - Melania Trump

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या (America) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अजूनही पराभव मेनी केलेला नाही. ट्रम्प यांनी आता पराभव मान्य करावा, असे त्यांच्या पत्नीसह निकटवर्तीय वर्तुळातील लोक त्यांना सांगत आहेत, अशी माहिती तेथील माध्यमांनी दिली.

मेलेनिया ट्रम्प (Melania Trump) यांनी जाहीरपणे याबाबत भाष्य केले नाही. पण खासगीमध्ये त्यांनी हे मत व्यक्त केले आहे असे वृत्त सीएनएनने दिले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची फेरनिवड व्हावी, यासाठी मेलेनिया ट्रम्प यांनी मागच्या महिन्यात प्रचार केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि सल्लागार जेराड कुशनर यांनी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव मान्य करण्याचा सल्ला दिला आहे. सूत्रांच्या हवाल्याने सीएनएनने हे वृत्त दिले आहे.

मतमोजणी सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन आणि डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला. त्या विरोधात ते कोर्टातही गेले. मंगळवारी अमेरिकेत मतदान झाले. त्यानंतर तब्बल चार दिवस मतमोजणी सुरु होती. शनिवारी रात्री निकाल जाहीर झाला. पेनसिल्व्हेनिया राज्याने बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले. या राज्यामुळे बायडेन यांना २७० पेक्षा अधिक ‘इलेक्टोरल व्होटस’ मिळालेत. निवडणूक जिंकण्यासाठी २७० व्होटसची गरज असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER