उच्च गुण मिळवणाऱ्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या वर्गात प्रवेश; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Supremecourt

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) शुक्रवारी एका खटल्यात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यानं जर खुल्या प्रवर्गासाठी निश्चित केलेले गुण प्राप्त केल्यास त्यांना खुल्या प्रवर्गात प्रवेश देण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टानं दिला आहे. राखीव प्रवर्गातील गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना राखीव प्रवर्गात ठेवण्यात येऊ नये, असा निकाल कोर्टानं दिला आहे.

सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी मागासवर्गीय किंवा राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांनं त्या प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या गुणांपेक्षा जास्त गुण प्राप्त केल्यास त्यांची निवड खुल्या प्रवर्गासाठी व्हावी. खुल्या प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या गुणांएवढे गुण राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यानं मिळवल्यास त्याला खुल्या वर्गात प्रवेश देण्यात यावा, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्या बेंचनं हा निकाल दिला. तामिळनाडू राज्य सरकार विरोधात के. शोभना यांच्या खटल्यात न्यायालयानं हा निकाल दिला आहे. तामिळनाडू सरकार कर्मचारी सेवा शर्ती कायदा २०१६ शी संबंधित हे प्रकरण होते. तामिळनाडूमधील ग्रॅज्युएट असिस्टंट अँड फिजिकल एज्युकेशन संचालक,ग्रेड-१ या पदासंबंधी वाद सुप्रीम कोर्टात पोहचला होता.

तामिळनाडूमधील मोस्ट बॅकवर्ड क्लासच्या विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून विचार झाला नसल्याचं म्हटलं होतं. खुल्या प्रवर्गातून निवड होण्याऐवजी एमबीसी आणि डीएनसीमधून निवड झाल्यानं प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचलं होतं.

महाराष्ट्रातील काय परिस्थिती?
महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाच्यावतीनं मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गाचं आरक्षण घ्यायचे असल्यास त्यांनी खुल्या प्रवर्गासाठी विहीत करण्यात आलेली परीक्षा फी भरण्यास सांगतिले जाते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गाची फी भरल्यास त्यांना दोन्ही प्रवर्गाचा लाभ घेता येतो. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा महाष्ट्रावर काय परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER