महाविद्यालयांचे प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत होणार सुप्रीम कोर्टाने याचिका निकाली काढल्या

CBSE & Sc

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) सध्या सुरु असलेल्या त्यांच्या इयत्ता १२ वीच्या ‘कम्पार्टमेंट’ परिक्षांचे निकाल १० आॅक्टोबरपर्यंत जाहीर करेल. महाविद्यालयांमधील प्रवेशप्रक्रिया त्यानंतर ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाईल. त्यामुळे ‘कम्पार्टमेंट’ परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना निकालानंतर पुढील प्रवेश घेण्यासाठी २० दिवसांचा पुरेसा अवधी उपलब्ध असेल, हे स्पष्ट झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीच्या यायिका गुरुवारी निकाली काढल्या.

‘सीबीएसई’ने पर्यायी मूल्यांकन पद्धतीने इयत्ता १० वी व १२ वीचे निकाल जाहीर केले आहेत. मात्र ज्यांनी तो पर्याय स्वीकारला नाही अशा विद्यार्थ्यांची ‘कर्पाटमेंट’ परीक्षा देशभरातील १,२७८ केंद्रांवर आजपासून सुरु झाली असून ती २९ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. इयत्ता १० वीचे १.५० लाखांहून थोडे अधिक तर इयत्ता १२ वीचे ८७, ६५१ विद्यार्थी या परीक्षा देत आहेत.

या परिक्षांचे निकाल लागण्यापूर्वीच महाविद्यालयांचे प्रवेश सुरु होऊन संपले तर प्रवेशाची संधी गमावून संपूर्ण वर्ष वाया जाईल. त्यामुळे महाविद्यालयीन प्रवेशांचे वेळापत्रक पुढे ढकलावे यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी याचिका केल्या आहेत. त्यावर न्या. अजय खानविलकर व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी याआधी सोमवारी सुनावणी झाली होती. खरे तर विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी)  त्याच दिवशी महाविद्यालये व विद्यापीठांचे यंदाचे शैक्षणिक वेळापत्रक त्याच दिवशी जाहीर करणार होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी  ते वेळापत्रक जाहीर न करता ‘सीबीएसई’ व ‘युजीसी’ या दोन्ही संस्थांनी आपसात समन्वयाने गुरुवारी नेमकी स्थिती स्पष्ट करावी, असे न्यायालयाने सांगितले होते.

त्यानुसार ‘सीबीएसई’ने गुरुवारी न्यायालयास असे सांगितले की, इयत्ता १२ वीच्या ‘कम्पार्टमेंट’ परिक्षांचे निकाल १० आॅक्टोबरपर्यंत जाहीर केले जातील. ‘युजीसी’ने असे सांगितले की, आाम्ही जे शैक्षणिक वेळापत्रक तयार केले आहे त्यानुसार महाविद्यालयीन प्रवेश ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण केले जातील. त्यानंतरही रिकाम्या राहणाºया जागा भरण्याचे काम ३० नोव्हेंबरपर्यंत चालेल आणि हंगामी प्रवेश ३१ डिसेंबर रोजी संपतील. न्यायालयाने दोन्ही संस्थांचे हे म्हणणे नोंदवून घेतले व ‘कम्पार्टमेंट’ परिक्षांचे निकाल जाहीर झाल्यावरही त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत प्रवेश घेण्यास पुरेसा अवधी मिळेल, असे नमूद करून याचिका निकाली काढल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER