महापालिका पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांना प्रशासकांनी ठोकले टाळे

Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर : सभागृहाची मुदत संपल्याने महापालिका प्रशासक म्हणून डॉ. कादंबरी बलकवडे (Dr. Kadambari Balkawade) महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारती असणाऱ्या महापौर, उपमहापौर यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांना कुलपे लावण्याचे आदेश दिले. याची अंमलबजावणी तत्काळ कऱण्यात अली. नगरसचिव विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या आयुक्त डॉ. बलकवडे यांनी सोमवारी प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यानंतर मंगळवारी मुख्य प्रशासकीय इमारतीतील सर्व विभागांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती, विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, महिला व बालकल्याण सभापती यांच्यासह सर्व पक्षांचे गटनेते यांच्या कार्यालयांना तत्काळ कुलपे लावण्याचे आदेश दिले होते. सर्वच पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला कर्मचाऱ्यांची नेमणूक नगरसचिव विभागातर्फे करण्यात येते.

ज्या वेळी पदाधिकारी बदलतात आणि नवीन पदाधिकारी येईपर्यंत दहा-बारा दिवस कर्मचारी अक्षरश: त्याच कार्यालयात बसून काढतात. परंतु प्रशासक बलकवडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांची त्यांच्या हुद्द्यानुसार यादी तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार सुमारे ४० कर्मचाऱ्यांची यादी काल बुधवारी तयार करून सादर केली होती. कोणत्याही पदाधिकाऱ्यांकडे स्वीय सहायक, क्लार्क, शिपाई, पहारेकरी म्हणून काम करण्यासाठी अनेकांची धडपड असते. वशिले लावून आपल्या नेमणुका कर्मचारी करून घेतात. काही कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच टेबलावर, एकाच कार्यालयात काम करीत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिने अन्य विभागांत सामावून घेण्यात येणार आहे. त्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून आज, गुरुवारपासून त्यांना बदलीच्या ठिकाणी हजर झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER