आ. राजन साळवींच्या निधीतून कोरोनासाठी रुग्णवाहिका घेण्याला प्रशासकीय मंजुरी

Rajan Salvi

रत्नागिरी/प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीमध्ये आमदार राजन साळवी यांनी स्थानिक विकास निधीमधून राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी प्रस्तावित केलेल्या आयसीयू रुग्णवाहिकेला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या रूग्णवाहिकेसाठी २२ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून ही रुग्णवाहिका लवकरच रुग्णसेवेत दाखल होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आणि त्यातही राजापूर तालुक्यात दररोज नवनव्या रुग्णांची भर पडत चालली आहे. अशा स्थितीत आ. साळवी यांनी सामाजिक बांधिलकीतून शिवप्रतिष्ठान संस्थेची रुग्णवाहिका यापूर्वीच राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी प्रशासनाकडे सुपूर्द केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार करून कोरोनाच्या काळात स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून लांजा व राजापूरसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER