प्रशासन लोकाभिमूख आणि नियमांचे पालन करण्यावर भर : डॉ.कादंबरी बलकवडे

Kadambari Balkwade- Mallinath Kalshetti -

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आयुक्त् पदाचा कार्यभार डॉ.कादंबरी बलकवडे (Kadambari Balkwade) यांनी आज मावळते आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी (Mallinath Kalshetti) यांच्याकडून स्विकारला.

नुतन आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे या 2010 च्या बॅचच्या आयएएस आहेत. त्यांनी 2010-15 या कालावधीत नागालॅण्ड येथे कार्यरत होत्या. 2015 – 16 यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी नागपूर, 2016- 18 या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नागपूर जिल्हा परिषद येथे काम केले आहे. 2018 पासून त्या जिल्हाधिकारी गोंदिया म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी गोंदिया येथे लोकसभा, विधानसभा, पोटनिवडणूकही यशस्वीपणे पार पाडली. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन अधिक गतीमान, पारदर्शक, लोकाभिमूख आणि नियमांचे पालन करुन करण्यावर आपला अधिक भर राहिल असे सांगून नुतन आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे म्हणाल्या, कोल्हापूर जिल्हयात काम करण्याची संधी मिळाली असून महानगरपालिकेच्या माध्यमातून अधिक चांगले काम करुन राज्यातील एक आदर्श महानगरपालिका म्हणून लौकिक कायम राखू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER