मुनगंटीवारांकडून आदित्य ठाकरेंचे भरभरून कौतुक; ‘आदित्य म्हणजे आजोबांचं स्वप्न पूर्ण करणारा, वाघाचं हृदय असलेला खरा नातू’

Aditya Thackeray-Sudhir Mungantiwar

मुंबई :  औरंगाबादच्या नामांतरावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ठाम मत व्यक्त केले. त्यांच्या बाणेदार विधानानंतर भाजपचे नेते, माजी मंत्री सुधिर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आदित्य ठाकरे यांचे भरभरून कौतुक केले आहे.

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर (Sambhajinagar) होणारच, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे. यावर मुनगंटीवार म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी नामांतर करून दाखवल्यास त्यांचं पहिलं अभिनंदन मी करेन, असं सांगतानाच आदित्य म्हणजे आजोबांचं स्वप्न पूर्ण करणारा, वाघाचं हृदय असलेला खरा नातू आहे, अशा शब्दांत त्यांचा गौरव करू, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

आदित्य ठाकरेंनी औरंगाबादचं नामांतर केल्यास त्यांची ऊंची तरुणांच्या मनात सह्याद्रीच्या पर्वतापेक्षा मोठी होईल. संभाजी महाराज देवासोबत जिथे कुठे बसले असतील तिथून त्यांना आशीर्वाद देतील. विधानसभेत भाजपतर्फे आदित्य यांच्या अभिनंदानाचा प्रस्ताव मांडणारा आमदार मी असेन, असं सुधीर मुनंगटीवार यांनी सांगितलं.

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दूरदूरपर्यंत सत्तेचा मोह नव्हता. त्यांनीच औरंगाबादकरांना औरंगाबादचं नामांतर करण्याचं वचन दिलं होतं. आजोबांचं हे स्वप्न जर नातू पूर्ण करत असेल तर अधिवेशनाच्या पहिल्याच भाषणात मी त्यांचं मोठ्या मनाने अभिनंदन करेल. आजोबांचं स्वप्न करणारा वाघाचं हृदय असलेला खरा नातू म्हणून त्यांचा गौरव करू, असंही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : औरंगाबाद महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडीची शक्यता! आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरुन काँग्रेस पदाधिकारी नाराज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER