उच्च न्यायालयाने कांजूर मेट्रोचे काम थांबवण्याचा आदेश दिल्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Mumbai High Court-Aditya Thackeray

मुंबई :- कांजूर मार्गमधील मेट्रो कारशेडचे (Kanjurmarg Metro Car Shed) काम तत्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिले असून ठाकरे सरकारला (Thackeray Government) मोठा दणका दिला आहे. तसेच भूखंडाची स्थिती आहे तशीच ठेवण्यास सांगितलं आहे. यासोबत जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयाने स्थगिती आणली आहे. आरेमध्ये मेट्रो कारशेड होऊ नये यासाठी पुढाकार घेणारे राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. मेट्रो मार्गासाठी ही जमीन महत्त्वाची  असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले, “पुढील वाटचाल ठरवण्यासाठी आम्ही कोर्टाच्या लिखित सविस्तर आदेशाची वाट पाहात आहोत. मेट्रो-३ सोबतच ६, ४ आणि १४ साठी ही जमीन महत्त्वाची आहे. यामुळे सरकारचे ५ हजार ५०० कोटी रुपये वाचत आहेत. एक कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर आज सुनावणी पार पडली. फेब्रुवारीत या प्रकरणी अंतिम सुनावणी सुरू होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER