आदित्य ठाकरेंच्या लढ्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचीही साथ

Aaditya Thackeray - Nationalist Youth Congress

मुंबई : भारत देशातील कोविड(COVID-19) रुग्णांची एकूण संख्या १० लाखांचा आकडा पार करत आहे. देश कोविड संक्रमणात जगात तिसऱ्या नंबरवर आहे. अशा चिंताजनक परिस्थितीतदेखील यूजीसीने (UGC) (विद्यापीठ अनुदान आयोगाने) सप्टेंबरपासून परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे यूजीसीच्या या निर्णयाविरोधात युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांविरोधात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, त्यांनी दाखल केलेल्या याचिकेचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने समर्थन केले आहे. याबाबतची माहिती खुद्द आदित्य ठाकरे यांनी दिली असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (Nationalist Youth Congress) आभारही मानले आहेत. युवासेनेने सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेला राष्ट्रीय युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिलेल्या समर्थनासाठी मी त्यांचे आभार मानतो. हा लढा प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे, शिक्षकांचा आहे. आम्ही तिन्ही युवा आवाज, यूजीसीला एवढेच सांगत आहोत की लाखो जीवांशी खेळू नका, असे ट्विट आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER