मनसेच्या मागणीची आदित्य ठाकरेंकडून दखल, परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार

Aditya Thackeray-Raj Thackeray

मुंबई : महाराष्ट्रातील असंख्य पालकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठविण्यासाठी कर्ज काढलेली आहेत. ऑगस्टमध्ये ह्या मुलांचे परदेशात पोहचणे अपेक्षित. त्यापूर्वी लस नियमांनुसार त्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात यावे अशी मागणी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्राच्या माध्यमातून केली होती. त्यांची ही मागणी राज्य सरकारने मान्य केली असून, याबाबतची माहिती खुद्द पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली आहे.

उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने आता लस दिली जाणार आहे. यासंदर्भात काल रात्री उशिरा मुंबई महानगर पालिकेने सुधारित पत्रक जारी केले आहे. यामुळे मुंबईतून परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थाना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालून परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद्या पासून लसीकरण सुरू होत असल्याची माहिती ट्वीटद्वारे दिली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button