शिवसेनेला धक्का : आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील नागरिकांचा राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश

Aditya Thackeray-Raj Thackeray

मुंबई :  पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला आहे . कोणत्याही पक्षात नसलेले सर्वसामान्य नागरिक कृष्णकुंजवर (krishnakunja) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर अली आहे . या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे .

मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी (Santosh dhuri)यांच्या नेतृत्वात अनेक जणांनी मनसेची वाट धरली आहे . वरळीतील एनजीओ, सार्वजनिक मंडळे यांचे कार्यकर्ते आणि काही सामान्य नागरिकांनी मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती धुरी यांनी दिली .शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत निवडून दिलं होतं; पण काही महिन्यातच इथल्या मतदारांना त्यांच्या कामाची प्रचिती आली.

लोकप्रतिनिधी कसा असावा, तर लोकातला असावा. सध्या कोणतीही निवडणूक नाही. परंतु राज ठाकरेंच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा या नागरिकांनी व्यक्त करत मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे धुरी यांनी सांगितले.

दरम्यान याअगोदर औरंगाबाद, मुंबई, पुणे अशा विविध भागांत कार्यकर्ते-पदाधिकारी यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागांतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केला होता, हे विशेष.

ही बातमी पण वाचा : घाबरून जाऊ नका : आदित्य ठाकरेंचे जमावबंदी आदेशावरून जनतेला आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER