‘त्या’ पार्टीत आदित्य ठाकरेही उपस्थित होते ; ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा!

Aaditya Thackeray - Nupur Mehta

मुंबई : सुशांतसिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) मँनेजर दिशा सालीयनने आयोजित केलेल्या एका पार्टीत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) उपस्थित होते असा धक्कादायक खुलासा अभिनेत्री नुपूर मेहता (Nupur Mehta) यांनी केला आहे. रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीवर बोलताना तिने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

ठाकरे सरकारमधील एका युवा मंत्र्याचा सुशांत सिंह प्रकरणात समावेश असल्याचे म्हणत विरोधी पक्ष भाजपने टीका केली आहे. अशातच नुपूर मेहताने केलेल्या खुलास्यामुळे नवीन वादंग पेटण्याची चिन्हे आहे .

दिशा सालियान ही सुशांतची मँनेजर होती. तिचे सुशांतच्या घटनेआधी निधन झाले होते. त्या घटनेवरही नेहमीच शंका घेतली जाते आणि नंतर या घटनेला सुशांतसिंग प्रकरणाशीही काही लोक जोडून बघतात.त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. यावर आता शिवसेना काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे, की सुशांतच्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. मात्र भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) हे माझ्याकडे काही पुरावे असून ते थोड्याच दिवसात समोर आणणार असून युवा मंत्री यामध्ये सामील असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER