
मुंबई :- पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली गेल्याचं समोर आलं होतं. वरळीतील नाईट क्लबमध्ये तुफान गर्दीमध्ये कोरोनाचे (Corona) सर्व नियम धुडकावत जोरदार पार्टीच आयोजन केले होते.
वरळीतील कमला मिलमधील सर्व पब मध्ये गर्दी झाली होती. तेथील ट्विस्ट या पबमध्ये तुफान गर्दी झाल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिले होते.
वरळीत आदित्य ठाकरेंचंच चालतं, त्यांनी सांगितल्यानेच पब-बार बिनधास्त सुरु : देवेंद्र फडणवीसhttps://t.co/gchlJkAfOL#Devendrafadnavis | #AadityaThackeray | #BJP | #Shivsena | #corona | @Dev_Fadnavis | @AUThackeray | @BJP4Maharashtra | @ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2021
वरळीतील पब आणि बारमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन झाले असल्यानं त्याची माहिती घेऊन कारवाई करणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरेंनी केली आहे. वरळीत घडलेल्या प्रकाराची माहिती घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाईट लाईफ आणि कोरोना निर्बंधांवरुन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं. वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असून तिथं त्यांचेच चालते. आदित्य ठाकरेंनी सांगितल्यानं पब आणि बार बिनधास्त सुरु असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोरोना हा फक्त शिवजयंती आणि अधिवेशनाच्या वेळी असतो नाईटलाईफला नसतो, असा टोला देखील त्यांनी लगावला.
ही बातमी पण वाचा : आदित्य ठाकरेंच्या सांगितल्यानेच पब-बार बिनधास्त सुरू : देवेंद्र फडणवीस
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला