आदित्य ठाकरेंकडून मुंबईतील पूरस्थितीची पाहणी; दिला ‘हा’ शब्द

Aditya Thackeray

मुंबई :  मंगळवारी संध्याकाळपासून मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते . या पार्श्वभूमीवर मुंबईतला पाऊस हा जगातल्या दुर्मिळ घटनांपैकी एक आहे, अशी प्रतिक्रिया देत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईकरांचे किती नुकसान झाले आहे याची पाहणी करून मग त्यांच्या नुकसानाची भरपाई कशी करता येईल हे बघू, असे आश्वासन दिले आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून रेल्वेसेवेवरही त्याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, आजही मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER