आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार – एएनआय

Aditya Thackeray

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी. ठाकरे घराण्यातील तीसरी पीढी अर्थात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानभा निवडणूक लढवणार आहेत हे निश्चित झाले आहे. शिवसेनेेने हा मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आदित्यंच्या रूपात प्रथमच ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणू्क लढवणार आहे.

शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभेतून उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचाच आहे. येथील विद्यमान आमदारांच्या ऐवजी आदित्य ठाकरे यांना संधी दिली जाणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवणे हा महाराष्ट्राच्या इतिहासातिल मोठी बातमी समजली जात आहे. आतापर्यंत ठाकरे घराण्यानी निवडणुका लढवल्या मात्र कोणीही मैदानात उतरून लढले नाही. हे प्रथमच ठाकरे घराण्यात घडत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे मैदानात उतरून निवडणूक लढणार आहेत.

यासंदर्भातील वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे. अर्थात शिवसेनेने अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. पण आदित्य ठाकरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

शिवसेना उमेदवारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना दिलेला शब्द पुर्ण करायचा आहे. महाराष्ट्राच शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवून दाखवणार हे स्वप्ण पुर्ण करायचे आहे असे ठाकरे म्हणाले होते. अर्थात शिवसेना भाजप युतीसंदर्भात काहीही ठरले नाही हे विशेष.

काल (रविवारी) शिवसेना आणि भाजपमध्ये युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कोट्यातील मतदारसंघातील उमेदवारांना घटस्थापनेच्या मुहुर्तावर AB फार्म वाटले होते. आमदार गौतम चाबुकस्वार- पिंपरी,,भास्कर जाधव- गुहागर,संग्राम दादा कुपेकर- चंदगड,सुजित मिणचेकर-हातकणंगले,योगेश रामदास कदम- दापोली,यामिनी यशवंत जाधव-भायखळा,संजय शिरसाट- औरंगाबाद,संतोष बांगर -हिंगोली,राजेश क्षीरसागर- कोल्हापूर,दीपक केसकर- सावंतवाडी,संजय बाबा घाडगे-कागल,चंद्रदीप नरके- करवीर,डॉ. सुजित मिणचेकर-हातकणंगले,सत्यजीत पाटील- शाहूवाडी,प्रकाश आबिटकर- राधानगरी,उल्हास पाटील-शिरुर,गुलाबराव पाटील-जळगाव (ग्रामीण),किशोर पाटील-पाचोरा,लता चंद्रकांत सोनवणे-चोपडा,दादाजी भुसे-नाशिक,नितीन देशमुख-बाळापूर,अर्जुनराव खोतकर- जालना,विश्वनाथ सानप- रिसोड,राजन साळवी- राजापूर,उदय सामंत- रत्नागिरी,सदानंद चव्हाण-चिपळूण,वैभव नाईक- कुडाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सध्या शिवसेनेचे 75 आमदार आहेत. तर, भाजपकडे 135 आमदार आहेत.