घाबरून जाऊ नका : आदित्य ठाकरेंचे जमावबंदी आदेशावरून जनतेला आवाहन

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबईत मध्यरात्रीपासून १४४ कलम लागू केले आहे. यावर राज्याचे पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुंबईत कोणतेही नवे निर्बंध लादण्यात आले नसून आधीच्या आदेशालाच मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे ट्विट आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केले आहे .

मुंबईकरांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कलम १४४ (Section 144)अंतर्गत देण्यात आलेले आदेश ३१ ऑगस्टच्या मागील आदेशाला दिलेली मुदतवाढ आहे. नव्याने कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाही. कृपया ही माहिती शेअर करा आणि घाबरू नका, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे .

दरम्यान ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईमध्ये १४४ कलम लागू असणार आहे. यानुसार मुंबईत सार्वजनिक ठिकाणी एक किंवा त्याहून अधिक व्यक्ती आढळून आल्यास मुंबई पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. मात्र मराठा आरक्षणावरून आक्रमक झालेल्या मराठा समाजाला मुंबईत कोणतेही आंदोलन करू न देण्यासाठी १४४ कलम लागू केले असल्याचे सांगण्यात येत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER