आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले; बैठक सुरु असताना बाहेर स्लॅबसह झुंबर कोसळलं; सह्याद्री अतिथगृहातील घटना

Aditya Thackeray - Maharashtra Today

मुंबई : मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. सह्याद्री अतिगृहात यावेळी बैठक सुरू होती. या ठिकाणी असलेल्या हॉल क्रमांक ४ बाहेरील स्लॅबसह झुंबर अचानक कोसळल्याने खळबळ उडाली. या घटनेवेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची बैठक सुरु होती . याचवेळी पीओपी स्लॅबसह झुंबर खाली कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही. यानंतर सह्याद्री अतिगृहात असलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर हलवण्यात आले .

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे थोडक्यात बचावले आहेत. कारण पर्यावरण विभागाची बैठक संपत आली असतानाच ही घटना घडली . विभागाची बैठक सायंकाळी सुरू असतानाच मोठा आवाज झाला. काहीजण बाहेर धावले. फॉलसिलिंग कोसळल्याचे लक्षात येतात सुरक्षारक्षकांनी अधिकाऱ्यांना व ठाकरे यांना तातडीने बाहेर काढले. कोणालाही इजा झाली नसली, तरी हा प्रकार कशामुळे घडला, हा महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. आदित्य ठाकरे यांनी घटनेचे फोटोही काढले व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्व माहिती दिली. सह्याद्री अतिथीगृहाचे बांधकाम जवळपास २५ वर्षांपूर्वीचे आहे. तिथे फॉलसिलिंग कधी केले, याची माहिती आता सार्वजनिक बांधकाम विभाग घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button