चक्रीवादळावर आदित्य ठाकरेंचे बारीक लक्ष; थेट वॉर रूममध्ये जाऊन घेतला आढावा

Aaditya Thackeray - Maharashtra Today

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाच्‍या प्रभावामुळे मुंबईत सुमारे ८० किलोमीटर वेगाने वारे वाहून मुसळधार पाऊस कोसळण्‍याचा अंदाज आहे. अक्षरशः तौक्ते चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही बसला आहे. मुंबईतील हिंदमाता आणि अन्य सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तर अनेक भागांत झाडे उन्मळून पडली आहेत. अशा वेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे महापालिकेच्या कंट्रोल रूममध्ये पोहचले. वादळाची तीव्रता संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ‘रात्रीपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील, विनाकारण घराबाहेर पडू नका, मुंबईत कधीही न झालेला वारा आपण पाहात आहोत. तसेच १६० मिमी, १२० मिमी पाऊस, वादळ आणि वाऱ्यासह होत आहे. मनुष्यहानी होणार नाही, याची काळजी घेत आहोत. हायटाईड आहे, ती निघून जाईल. पण त्यानंतरही खबरदारी घ्यावी लागेल.’ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाल्याची माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. केंद्र आणि राज्यात चर्चा सुरू आहे. आवश्यक सूचना दिल्या जात आहेत. एकमेकांशी समन्वय साधून, सर्व जण मिळून काम करत आहोत, असेही आदित्य म्हणाले.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button