एकनाथ शिंदे यांना कोरोना झाल्याचे कळताच आदित्य ठाकरेंनी लिहिला ‘हा’ संदेश

Aditya Thackeray and Eknath Shinde.jpg

मुंबई : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. शिंदे यांच्या ट्विटनंतर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांना ट्विट करून लवकर बरे होण्यास सांगितले आहे. सोबतच एक सल्लाही दिला आहे. एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांनी बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तर, ‘एकनाथ शिंदेजी काळजी घ्या, गेले ६ महिने कोरोना विरुद्धचा लढा आपणदेखील फ्रंटलाईनवरूनच लढत आहात. आपण लवकर बरे होऊन महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हाल ही मला खात्री आहेच, पण पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा!’ असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्विट करून त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांना  कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने काल टेस्ट केली होती. अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ‘माझी प्रकृती ठीक आहे. काळजी करू नका. परंतु, माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोव्हिड चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी. ’ असं आवाहन शिंदे यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER