आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात युवासेना सरसावली ; दिंडोशीत केली ऑक्सिजन बँकची निर्मिती 

Maharashtra Today

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे . यापार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये म्हणून दिंडोशीत युवासेना प्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांच्या संकल्पनेतून ‘ऑक्सिजन बँक’ (Oxygen Bank)ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. या संकल्पनेत रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होईपर्यंत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करून दिले जाणार आहे . यासंदर्भात माहिती युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित सुनील प्रभू (Sunil Prabhu)यांनी दिली. दिंडोशी येथील एकूण आठ प्रभागांत ही योजना राबविण्यात येणार असून यासाठी एकूण 21 जणांची टीम कार्यरत असणार आहे.

कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता दूर करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेचा शुभारंभ नुकताच शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, स्थानिक आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला.
कोविड रुग्ण घरी असताना त्याची ऑक्सिजन पातळी ही कमी-जास्त होत असते. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी दिंडोशी युवा सेनेच्या माध्यमातून दिंडोशी विधानसभेतील प्रत्येक प्रभागात आम्ही ‘ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन उपलब्ध करून दिले आहे. डॉक्टर आणि नर्सच्या मार्गदर्शनाखाली गरजू कोविड रुग्णांनी येथील युवा सेनेच्या टीमशी संपर्क साधल्यावर त्यांना त्वरित घरपोच ‘ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन’ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे अंकित प्रभू म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button