आदित्य ठाकरेंकडून मेट्रो कारशेडच्या नवीन जागेची पाहणी

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये (Metro Car Shed Kanjurmarg) होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आज आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) कांजूरमार्गमधील नव्या जागेची पाहणी केली.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी मुख्यमंत्री कार्यालय, एमएमआरडीए, एमएमआरसीएल अधिकाऱ्यांसोबत कारशेड उभारण्यासाठी एमएमआरडीएकडे (MMRD)सोपवण्यात आलेल्या जागेवर भेट दिली. सुधारित प्लॅनसह कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मेट्रो- ३ आणि ६ चे कारशेड उभारले जाणार आहे . या ठिकाणच्या मातीचं परीक्षण यापूर्वीच सुरू झाले आहे. जागेची पाहणी करण्यासाठी मीदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER