अनाथ झालेल्या भावंडाना आदित्य ठाकरेंकडून धीर, चार लाखांची मदत सोपवली

Aditya Thackeray

मुंबई :- नुकताच येऊन गेलेल्या ‘तौकते’ चक्रीवादळात झाड अंगावर कोसळून मृत्यू झालेल्या वरळी येथील संगीता खरात यांच्या कुटुंबीयांची पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भेट घेतली. या दुर्घटनेमुळे दोन भावंड अनाथ झाले असून त्यांना आदित्य ठाकरेंनी धीर देत सांत्वन केले. खरात कुटुंबीयांना राज्य सरकारकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदतही यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते खरात कुटुंबीयांकडे सोपवण्यात आली.

कोकण (Konkan) किनाऱ्यावर धडकेलेल्या ‘तौकते’ चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) १६ मे रोजी मुंबईच्या किनाऱ्यांवरही थैमान घातले. मुंबईत वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे २२६३ झाडे-झाडाच्या फांद्या उन्मळून पडल्या. या वादळात आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील वरळी येथील संगीता खरात यांच्या अंगावर झाड कोसळून त्यांचा मृत्यू झाला. संगीता खरात या धुणीभांडी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होत्या. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांची दोन मुले अनाथ झाली.

या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी खरात कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. सरकार आपल्या पाठीशी असल्याचा धीर यावेळी त्यांनी खरात कुटुंबीयांना दिला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant), उपनेते सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, नगरसेवक अरविंद भोसले, संतोष खरात, अनुपमा परब, राजेश दुबे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button