आदित्य ठाकरेंनी दिल्या अहिर यांना शुभेच्छा

Sachin Ahir-Aditya Thackeray

मुंबई : विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केलेले सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी अहिर यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

‘माझे सहकारी सचिन अहिरजी तुमची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! आता फक्त वरळीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी तुम्ही अधिक जोमाने काम करतील असा मला विश्वास आहे.’ असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

तर, ‘पाठिंबा आणि विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद’ असं म्हणत सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंचे आभार व्यक्त केले आहेत.

राष्ट्रवादीचं मुंबई अध्यक्षपद भूषवत असताना सचिन अहिर यांनी पक्षाला मोठा धक्का दिला होता. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर 25 जुलै 2019 रोजी सचिन अहिरांनी शिवबंधन हाती बांधलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती