आपण छोट्या विषयावर बोलत नाही; आदित्य ठाकरेंचा नाव न घेता राणेंना टोला

Aditya Thackeray-Narayan Rane

पालघर : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची घोषणा केली आहे. राणे यांच्या भाजपप्रवेशाच्या निर्णयावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला आहे . आपण छोट्या विषयावर बोलत नाही, आम्हाला नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे. आज एकमेकांच्या राजकीय करिअरवर बोलायला लागल्यावर लोक आम्हाला वेडे समजतील. शिवसेना महाराष्ट्राचे स्वप्न बघत आहे, असे आदित्य म्हणाले .

दरम्यान शिवसेना-भाजपमध्ये काहीही ठरो, पण माझा भाजपमध्ये प्रवेश नक्की आहे, असं सांगत मुंबईतच भाजपमध्ये प्रवेश व्हावा, अशी इच्छा, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली. त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे हे भाजपमधूनच निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच आपण स्वत: निवडणूक लढवणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपमध्ये जाण्यासाठी कोणतीही अट ठेवली नसून कोणतीही मागणी केली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.