कांजूरमार्गची जागा राज्य सरकारचीच – आदित्य ठाकरेंचा दावा

Aditya Thackeray

मुंबई :- कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या जागेच्या वादात उडी घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटलं आहे. महसुली नोंदीनुसार ही जागा राज्य सरकारची आहे. मेट्रोची जागा आरे कारशेडवरुन कांजूरमार्ग या ठिकाणी हलवण्यात आली. त्याबाबत भाजपाने शिवसेनेवर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली होती. आता केंद्राने कांजूरच्या जागेवर दावा केला आहे. या वादात कांजूरच्या जागेवर मेट्रो कारशेड होणार की नाही हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

आरेला पर्याय म्हणून मेट्रो कारशेडसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा केला आहे. ही जागा आपल्या मालकीची असून, ती मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना केंद्राने राज्याला केली आहे. त्यामुळे केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत.

ही बातमी पण वाचा : कांजूरमार्ग कारशेडच्या जागेवरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने

या वादात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी भाजपावर टीका करण्यास सुरुवात केली. भाजपा मुंबईच्या विकासाच्या आड येते आहे. भाजपाला हा प्रकल्प रखडवायचा आहे, असा आरोप करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार हळूहळू आणीबाणीच्या दिशेने देशाला नेत असल्याचा आरोप केला आहे.

भाजपाच्या नेत्यांनीही आज दिवशभर आपली बाजू लढवत या जागेवरच्या केंद्र सरकारच्या दाव्याला पाठिंबा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER