कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे आदित्य ठाकरे यांच्याकडून कौतुक

Aaditya Thackeray

कल्याण : आनंदीबाई पाटील (Anandibai Patil) या १०६ वर्षीच्या वयोवृद्ध महिलेस कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या वयामुळे अनेक रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली. परंतु डोंबिवली येथील वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील, कोविड समर्पित रुग्णालयातील डॉ. राहुल घुले यांनी त्यांना तिथे दाखल करून घेतले. आणि आज उपचाराअंती, आनंदीबाई पाटील या कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यास वै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे कोविड (COVID-19) समर्पित रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अथकपणे काम करणारे महापालिका प्रशासन, डॉ. राहुल घुले यांचेवर सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. पर्यावरण मंत्री मा. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देखील ट्विट करून महापालिका प्रशासन व डॉ. राहुल घुले यांचे कौतुक केले आहे.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण नागरिकांमध्ये पसरले असताना 106 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेस कोरोनामुक्त होऊन डिसचार्ज मिळणे ही खचितच सकारात्मक आणि समाधान कारक बाब असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER