डिसेंबरमध्ये लग्न करणार आदित्य नारायण

Aditya Narayan will get married in December

लॉकडाऊनचा निराशेचा काळ असतानाही काही नायिकांनी मातृत्वाचा आनंद घेतला तर काही कलाकारांनी लग्न करून निराशेच्या काळात जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनेत्री काजल अग्रवाल आणि गायिका नेहा कक्कड यांनी नुकतेच लग्न केले. आता आदित्य नारायणही (Aditya Narayan) डिसेंबर महिन्यात लग्न (married)करणार आहे. स्वतः आदित्यनेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाची माहिती दिली आहे.

आदित्यने काही दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालबरोबरचे त्याचे संबंध जगजाहीर केले होते. तसेच आम्ही लवकरच लग्न करणार आहोत असेही त्याने सांगितले होते. आदित्य नारायणने 11 वर्षांपूर्वी ‘शापित’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात श्वेता त्याची नायिका होती. शूटिंग सुरु असतानाच दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले होते. गेल्या 11 वर्षांपासून दोघेही डेटिंग करीत आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत आदित्यने लग्नाची माहिती दिली आहे. पोस्टमध्ये आदित्यने म्हटले आहे, आम्ही लग्न करीत आहोत. मी जगातील सगळ्यात नशीबवान आहे, कारण मला श्वेता मिळाली. 11 वर्षांपूर्वी माझी प्रियतमा माझ्या जीवनात आली. आणि आता अखेर डिसेंबरमध्ये आम्ही लग्न करणार आहोत. आम्ही दोघेही खाजगी जीवन खाजगीत ठेवणारे आहोत. आणि त्यावर आमचा विश्वासही आहे. लग्नाच्या तयारीसाठी आता काही दिवस आम्ही सोशल मीडियावरून सुट्टी घेत आहोत असेही आदित्यने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER