आदित्य नारायणने खरेदी केला पाच बेडरूमचा फ्लॅट

Shweta Agarwal - Aditya Narayan

प्रख्यात गायक उदित नारायणचा (Udit Narayan) गायक आणि टीव्हीवरील कार्यक्रमांचा होस्ट असलेल्या मुलाने उदित नारायणने नुकतेच त्याच्या प्रेमिकेसोबत अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न केले. लग्नानंतर नवीन घरात राहाण्यासाठी आदित्यने (Aditya Narayan) अंधेरीत पाच बेडरूमचा नवीन फ्लॅट विकत घेतला आहे. हा फ्लॅट इतकी वर्ष जमा केलेल्या पैशातून खरेदी केल्याचे आदित्यने म्हटले आहे.

एक डिसेंबर रोजी आदित्यने श्वेता अग्रवालबरोबर (Shweta Agarwal) लग्न केले. आदित्यने जेव्हा चित्रपटसृष्टीत ‘शापित’ सिनेमाच्या माध्यमातून नायक म्हणून पदार्पण केले तेव्हा त्याच्या पहिल्या सिनेमाची नायिका श्वेताच होती. श्वेताने त्यानंतर काही मालिकांमध्येही काम केले आहे. त्या सिनेमापासून या दोघांचे अफेयर सुरु झाले होते. जवळ जवळ दहा वर्षे दोघे डेटिंग करीत होते आणि आता त्यांनी लग्न केले आहे. आदित्यच्या जवळच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहा ते बारा कोटी रुपये खर्च करून आदित्यने एक आलिशान भव्य लक्झरी फ्लॅट घेतला आहे. विशेष म्हणजे त्याचा हा फ्लॅट त्याच्या आईवडिलांच्या घरापासून फक्त तीन इमारती दूर आहे.

नवीन घराचा आनंद आदित्यने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आदित्यने याबाबत सोशल मीडियावर लिहिले आहे, मी अंधेरीत पाच खोल्यांचा फ्लॅट विकत घेतला आहे. हा फ्लॅट माझ्या आई-वडिलांच्या घरापासून केवळ तीन इमारती दूर आहे. तीन-चार महिन्यात आम्ही तेथे शिफ्ट करणार आहोत. हे घर घेण्यासाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून सेव्हिंग्ज करीत होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER