मुख्यमंत्री ठाकरेंकडून अमित ठाकरेंची पुन्हा एक मागणी मान्य, खुद्द आदित्य ठाकरेंनी दिली माहिती

Aditya Thackeray-Amit Thackeray- Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तसेच आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमित ठाकरे यांची आणखी एक मागणी मान्य केली आहे. बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर केला. कोरोना लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच, यामुळे डॉक्टर्सना सुद्धा प्रोत्साहन मिळणार आहे, असंही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा:- बँकांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप त्वरित करावे – मुख्यमंत्री 

त्याआधी अमित ठाकरे यांनी पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे आता या दोन्ही मागण्या आता पूर्ण झाल्या आहेत.

वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रित डॉक्टर्सना ६० हजारांच्या ऐवजी ७५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. आदिवासी भागातील बंधपत्रित विशेषज्ञ डॉक्टर्सना ७० हजार ऐवजी ८५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. तर इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना ५५ हजारांऐवजी ७० हजार रुपये मानधन आणि इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्वीट करत दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER