वडिलांच्या आठवणीने भावुक झाले आदित्य चोपडा !

Aditya Chopra - Yash Chopra

यश चोपडा यांच्या जयंतीनिमित्त आदित्य चोपडाने एक सुंदर चिठ्ठी शेअर केली. आज यशराज फिल्म्सने (YRF) ५० वर्षे पूर्ण केली.

यशराज फिल्म्सचे (Yashraj Films) प्रमुख आदित्य चोपडा (Aditya Chopra) यांनी एक पत्र शेअर केले आहे.  त्यांनी लिहिले आहे की, प्रॉडक्शन हाऊसने ५० वर्षे पूर्ण केली आहेत. तसेच दिवंगत निर्माता दिग्दर्शक यश चोपडा (Yash Chopra) यांच्या वाढदिवशी हे पत्र बरेच काही सांगते आहे. आदित्य चोपडा यांनी पत्राद्वारे त्यांचे वडील बीआर फिल्म्सचे पगारदार कर्मचारी असल्याचे सांगितले आणि जेव्हा त्यांनी कंपनी सुरू केली तेव्हा त्यांना वारसाशिवाय काहीच नव्हते.

यशराज फिल्म्सची  २५ वर्षे पूर्ण झाल्यावर ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ बनवल्याचेही त्यांनी सांगितले. कंपनी ५० वर्षे पूर्ण करत असल्याने आदित्यने आपल्या खास योजना काय आहेत याची घोषणा केली. त्यांनी वायआरएफशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचे आभार मानले आणि सांगितले की, प्रत्येक जन्मात बॉलिवूडचा भाग होण्यास आवडेल. वायआरएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य चोपडाने अभिनेत्री राणी मुखर्जीशी लग्न केले. या जोडप्यास एक मुलगी अदिरा आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER