लोपाला गेलेला हिंदूधर्म पुन्हा प्रस्थापित करणारे आदी शंकराचार्य!

Maharashtra Today

जे लोक इतिहासाला संपुर्ण सत्य मानतात आणि पुराण कथा ज्यांच्यासाठी असत्य आहे त्यांना आदी शंकराचार्यांचा (Adi Shankaracharya) अद्वैताचा मुलभाव समजणं अशक्य आहे. शंकराचार्य त्यांच्या तत्वज्ञानात सांगतात ‘जगत् मिथ्या, ब्रम्ह सत्यम’ म्हणजेच वैज्ञानिक निष्कर्षांसहीत तमाम दुनियेतील गोष्टी भ्रम आहेत. जे सात्विक सत्य आहे तेच ब्रम्ह आहे. या सत्याला अनेकांनी ‘ईश्वर’, ‘आत्मा’, ‘चेतना’, इत्यादी नावं दिली आहेत.

राजकीय संत होते शंकराचार्य

शंकराचार्य यांचं तत्त्वज्ञान स्पष्टपणे वैदिक होतं. बुद्ध आणि जैन विद्वानांकडून त्यांनी इतर धर्मांच तत्त्वज्ञानही आत्मसात केलं होतं. त्यांच्या प्रचवनात आणि लिखानात वारंवार ‘निराकार ब्रम्ह’चा उद्देश्य होतो. त्यालाच अंतिम त्यांनी सत्य मानलं आहे. निराकार ब्रम्ह आणि मिथ्या जगताबद्दल बोलताना त्यांनी १२ जोतिर्लिंगे, १८ शक्तिपीठं आणि चारही विष्णू धामांची यात्रा केली. ही सर्व दैवीस्थानं भारताला एकसुत्रात बांधायचं काम करत होती. शैव, वैष्णव, शाक्त हे लोक होते. बंदाती होते. शंकराचार्यांनी या सर्वांना एकत्र करण्याच काम केलं.

केरळपासून ते काश्मिरपर्यंत, ओडीसामधील पुरीपासून गुरजातमधल्या द्वारकेपर्यंत, कर्नाटकाच्या श्ऱंगेरीपासून ते उत्तराखंडच्या बद्रीनाथापर्यंत आणि तामिळनाडूच्या कांचीपासून ते उत्तरप्रदेशच्या काशीपर्यंत त्यांनी सर्व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. हिमालयांच्या शिखरांपासून ते नर्मदेच्या तटापर्यंत त्यांनी यात्रा केल्या. त्यांची ही यात्रा केवळ धार्मिक तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार करणारी नव्हती तर राजकीय संत म्हणून त्यांची ओळख ठळक करणारी होती. भारत भूच्या या महाकाय प्रदेशालात त्यांनी एकासुत्रात गुंफण्याचा प्रयत्न केला.

शंकराचार्यांच्या यात्रेचे ऐतहासिक संदर्भ

शंकराचार्य त्यांच्या ‘ब्रम्हसुत्र’ या ग्रंथात लिहतात, “कुणी म्हणू शकतं की इथं कधीच कोणता चक्रवर्ती सम्राट नव्हता. कारण इथं अजून कोणताच राजा नाहीये.” त्यांचं हे विधान त्यावेळच्या विभागल्या गेलेल्या समाजाचं रुप दर्शवतो. इतिहासकारांच्या मते आजपासून १३०० वर्षांआधी म्हणजे सातव्या शतकात आदी शंकराचार्यांचा कार्यकाळ होता. भारतीय इतिहासातला तो संक्रमणाचा काळ होता.

गुप्त सम्राज्याच्या पतनाला सुरुवात झाली होती. मुस्लीम साम्राज्य दक्षिण आशियात वाढत होते. कन्नोजचा शासक हर्षवर्धनचा मृत्यू झाला होता. नर्मदेच्या दोन्ही किनाऱ्यांवर राष्ट्रकुट साम्राज्याचा बोलबाला होता. उत्तरचे प्रतिहर, पुर्वेचे पाल आणि दक्षिणेच्या चालुक्यांच्यात वारंवार संघर्ष होत होता. त्याचवेळी क्षेत्रीय भाषा आणि लीपी आजच्या प्रमाणं अस्तित्त्वात नव्हत्या. रामायणाचा तमिळ अनुवाद नव्हता. जयदेवानं त्याच्या गीतांमधून ‘गीता गोविंद’ या काव्याची रचना केली नव्हती. जयदेवानचं जगासमोर राधा आणि कृष्णा मांडले. याकाळात शंकराचार्य संपूर्ण भारताचा दौरा करत होते. संस्कृत या एकमेव भाषेच्या जोरावर त्यांनी सर्वांशी संवाद साधला.

शंकराचार्यांनी दिला हिंदूत्त्वाला जन्म

शंकराचार्यांना समजण्यासाठी हिंदूत्त्वाचा विचार समजन गरजेचं आहे. देव साकार आणि निराकार स्वरुपासह अनेक स्वरुपाचा असू शकतो असं ते म्हणायचे. शंकराचार्यांनी आपल्या चारी दिशेला संपूर्ण जग लहान-सहान क्षणभंगूर आणि सिमित सत्यांनी भरलेले आहे असं मानलं. बौद्ध धर्माच्या उलट त्यांच्या मान्यता होत्या. संपूर्ण जग एका अखंड, शास्वत आणि असिमीत सत्यावर टिकून असल्याचं ते मानायचे.

बौद्ध धर्माचा भारतात प्रचार प्रसार न होण्याच प्रमुख कारण बोद्ध धर्मियांचं कलेत आराम शोधण्याची प्रक्रिया हे सुद्धा आहे. दुसऱ्या बाजूला पुराण कथा पुजापाठ, नाचगाणी, भजन किर्तन यांच्या माध्यमातून ज्ञान प्रवाहित करण्यावर भर देत होते. शंकराचार्यांना या गोष्टीची कल्पना होती. कथांमधून आणि गाण्यातून लोकांशी जोडलं जाणं सहजशक्य आहे. त्यांनी पौराणिक परंपरा अवलंबल्या. म्हणून हिंदू धर्म वाचवणारा योद्धा अशी ख्याती त्यांनी अल्पवाधीतच मिळवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button