अ‍ॅडिलेड ओव्हल का आहे डेव्हिड वॉर्नरसाठी ‘लकी’?

David WaRNER

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने अ‍ॅडिलेड येथे पाकिस्तानविरुध्द केलेल्या नाबाद ३३५ धावांच्या खेळीत अनेक विक्रम केले. अ‍ॅडिलेड ओव्हल मैदानावरचा तो पहिलाच त्रिशतकवीर तर बनलाच, शिवाय ऑस्ट्रेलियातर्फे दुसºया क्रमांकाची सर्वोच्च कसोटी खेळी त्याने आपल्या नावावर केली. ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने डाव घोषित केला नसता तर कदाचित मॅथ्थ्यू हेडनच्या ३८० धावा आणि ब्रायन लाराच्या ४०० धावांचा विश्वविक्रमही मोडला गेला असता.

या विक्रमांच्या दरम्यान डेव्हिड वॉनॅरचा अ‍ॅडीलेड ओव्हल मैदानाबाबतचा एक अनोखा विक्रम मात्र फारच थोड्या लोकांच्या लक्षात आला. तो म्हणजे वॉर्नरच्या कसोटी, वन-डे आणि टी-२० या तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांतील सर्वोच्च खेळी याच मैदानावर आहेत. याप्रकारे अ‍ॅडीलेड ओव्हल हे मैदान त्यासाठी ‘लकी चार्म’ ठरले आहे.

त्याच्या ताज्या नाबाद ३३५ धावा ही अर्थातच त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी आहे. वन डे सामन्यांमध्ये १७९ धावांची त्याची खेळी सर्वोच्च आहे जी त्याने अ‍ॅडिलेड ओव्हलवरच २६ जानेवारी २०१७ रोजी पाकिस्तानविरुध्द केली होती आणि टी-२० मध्ये त्याची सर्वोच्च खेळी नाबाद १०० धावांची आहे. ही खेळी त्याने अ‍ॅडीलेड ओव्हलवरच २७ आॅक्टोबर २०१९ रोजी श्रीलंकेविरुध्द केली होती.

याशिवाय आपली वन डे ती दोन शतके, कसोटीतील चार आणि टी-२० तील एकमेव शतक त्याने याच मैदानावर केले आहे. अ‍ॅडिलेड ओव्हलवरच्या ८ कसोटी सामन्यात ८०.३५ च्या सरासरीने १०४५ धावा त्याच्या नावावर आहेत. त्यामुळे टीम पेनने डाव घोषित केला नसता तर कदाचित वॉनंरने नवा विश्वविक्रम केला असता असे म्हणण्यास नक्कीच वाव आहे.