देशात ३० लाख मेट्रिक टन साखरेचा अतिरिक्त साठा

sugar Additional stock

नवी दिल्ली : केंद्रीय अन्न पुरवठा मंत्रालयाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकानुसार देशभरातील साखर (sugar) कारखान्यांकडून २०१८-१९ ची एफआरपीची ६८९ कोटी रुपये तर २०१९-२०ची १७ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. उत्पादीत साखरेपैकी देशांतर्गत वापरातील २० लाख मेट्रीक टन आणि निर्यातीसाठी राखीव काेट्यातील १० लाख मे. टन अशी मिळून सुमारे ३० लाख मे. टन अतिरिक्त साखर शिल्लक राहण्याची शक्यता आहे. परिणामी आर्थिक अडचणीतील साखर उद्योगाला शिल्लख साखरेचा पुन्हा दहा हजार कोटी रुपयांचा बोजा सोसावा लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

२०१९-२०च्या हंगामात साखरेचा ४० लाख मे. टन बफरस्टॉक केला. त्यासाठी १६७४ कोटी रुपयांची तरतूद केली. ६० लाख मे. टन निर्यात होणाऱ्या साखरेला प्रति टन १०४५ रुपये सबसिडीसाठी ६२६८ कोटींची तरतूद आहे. इथॉनॉल १८६०० काेटींचे कर्ज कमी व्याज दरात उपलब्ध केले . पाच वर्षात या व्याजात सुट दिलेली रक्कम साधारण ४०४५ कोटी रुपयांचे असेल. चालू आर्थिक वर्षात साखरेचा वापर २६० लाख मे.टन च्या ऐवजी २४०च होईल. काेराेना महामारीमुळे देशांतर्गत वापरात सुमारे २० लाख मे. टन कमी होईल. निर्यात ६० लाख मे. टनांऐवजी ५० लाख मे टन होण्याची शक्यता आहे. अशी सुमारे तीस लाख टन साखर अतिरिक्त राहणार आहे.

दृष्टीक्षेप
शिल्लक साखर (१ ऑक्टोबर २०१९) – १४५ एमएमटी
१९-२० संभाव्य उत्पादन -२७० एमएलटी
देशांतर्गत वापर -२४० एमएलटी
निर्यात – ५० एमएलटी
३० सप्टेंबर २०२० चा साठा -१२५ एमएलटी
३० एप्रिलपर्यंतची शिल्लक साखर – २३५ एमएलटी
२०१८-१९ ची थकीत एफआरपी – ६८९ कोटी रु.
२०१९-२० ची थकीत एफआरपी – १७ हजार १३४ कोटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER