कल्याण-डोंबिवली कोविड-१९ रुग्णांसाठी सर्व रुग्णालयांमध्ये अतिरिक्त ऑक्सिजन साठा असावा – राजू पाटील

Raju Patil

डोंबिवली :- दररोज अत्यवस्थ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयात धाडले जात असताना यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे. शुक्रवारी सकाळी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर संपल्यानंतर तब्बल तीन तास सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागली. या काळात दोन अत्यवस्थ रुग्ण ऑक्सिजनअभावी तडफडत होते. काही दिवसांपूर्वी शास्त्रीनगर इस्पितळात ऑक्सिजन सिलिंडर वेळेत न मिळाल्याने कल्याणमधील एका रुग्णाचा मृत्यूसुद्धा झाला आहे. तर कल्याण-डोंबिवलीमधील कोविड-१९ रुग्णांसाठी सर्व रुग्णालयांमध्ये अतिरिक्त ऑक्सिजन साठा करून ठेवण्याबाबतचे पत्र मनसे आमदार राजू पाटील यांनी २४ जून रोजी आयुक्तांना दिले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहेत.

शुक्रवारी सकाळी रुग्णांना उपचार करताना उपलब्ध असलेले सिलिंडर संपण्यापूर्वीच ते पुरविण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराला तातडीने सिलिंडर आणून देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही ते न मिळाल्याने रुग्णालय प्रशासनाला तीन तास सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागली. उपलब्ध सिलिंडर संपलेले असताना ठेकेदाराकडून वेळेवर पुरवठा न झाल्यामुळे दोन अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजनअभावी तडफडावे लागल्याचे भीषण वास्तव या रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या अन्य रुग्णांनी अनुभवले. याबाबतची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रशासनावर टीकेची झोड उठविली जात आहे. तर कल्याण-डोंबिवलीमधील कोविड-१९ रुग्णांसाठी सर्व रुग्णालयांमध्ये अतिरिक्त ऑक्सिजन साठा करून ठेवण्याबाबतचे पत्र मनसे आमदार राजू पाटील यांनी २४ जून रोजी आयुक्तांना दिले होते.मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहेत. आतातरी आयुक्त लक्ष देतील का हे पाहावे लागेल.

ही बातमी पण वाचा : पुणे जिल्ह्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील टेस्टिंग इनचार्ज पण….

याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की कोविड-१९ ग्रस्त रुग्णांना बहुतांश उपचारासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. महानगरपालिका क्षेत्रात वाढत चाललेले रुग्ण पाहता रुग्णालयांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनची कमी भासू शकते. काही दिवसांपूर्वी बिल मिळाले नसल्याने ऑक्सिजन पुरवठादारांनी तीन  दिवस पुरवठा बंद केला होता, अशी माहिती मिळत आहे. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास परिस्थिती अधिकच बिघडू शकते. त्यासाठी आधीच पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे. तरी कृपया आपण तत्काळ लक्ष घालून, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होत असलेल्या रुग्णांची अडचण होऊ नये, याकरिता सर्व रुग्णालयांमध्ये किमान पुढील १० दिवस पुरेल एवढा ऑक्सिजन साठा करण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत आणि शुुक्रवारसारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी खबरदारी घ्यावी. तसेच कोरोना रुग्णांसाठी कुठल्या दवाखान्यात किती बेड्स  उपलब्ध आहेत की नाही ते समजण्याकरिता ठाणे आणि नवी मुंबई या महापालिकेने डॅशबोर्ड (#Dashboard) उपलब्ध करून दिले आहेत. तसे मात्र केडीएमसीने असे डॅशबोर्ड उपलब्ध करून दिलेले नाहीत. तरी लवकरात लवकर कल्याण-डोंबिवलीमधील नागरिकांना डॅशबोर्ड (#Dashboard) उपलब्ध करून द्यावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER