रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 6 कोरोना रुग्णांची भर; एकूण 151

Corona Virus Positive

रत्नागिरी : मिरज येथून नुकतेच 27 अहवाल प्राप्त झाले असून त्यात रत्नागिरी येथील 20 आणि कळंबणी येथील 1 अहवाल असे एकूण 21 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कळंबणी येथील 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खेड तालुक्यातील तळे या गावातील एका कुटुंबातील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व मुंबई येथून दाखल झाले होते व त्यांना ताप असल्याने क्वारंटाइन खाली ठेवण्यात आले होते. यात 2 स्त्री व 2 पुरुष आहेत. खेड तालुक्यातील अन्य दोन पुरुष रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे देखील मुंबई आणि ठाणे येथून आलेले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER