तीन चाकांच्या आघाडीला जनतेचे चाक जोडल्याने आमची गाडी सुसाट – छगन भुजबळ‌

Chhagan Bhujbal

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीने जाेरदार मुसंडी मारली. आघाडीच्या तीन चाकांच्या सरकारला एक जनतेचे चाक जोडले गेले असल्याने आमची गाडी सुसाट सुरू आहे. त्यामुळे भाजपचे सत्तेचे स्वप्न साकार होणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ‌ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

लासलगाव ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण भूमिपूजन पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते . कोरोनाच्या काळात सुरुवातीला दर महिना साडेतीन लाख टन धान्य नागरिकांना वितरित केले जात होते. त्यानंतर त्यामध्ये वाढ करून नऊ लाख टन धान्याचे वाटप दर महिना नागरिकांना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात जयदत्त होळकर यांनी लासलगाव व परिसरातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सोळा गाव पाणी योजनेकरिता जलवाहिनीसाठी निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली .

मंदिरे खुली करण्यासाठी ज्यांनी आरडाओरडा केला, ते मंदिरे उघडल्यानंतर अजूनही मंदिरात गेले नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्रातील मंदिरे बंद होती. ज्यांनी मंदिरे खुली करण्यासाठी आरडाओरडा केला ते लोक मंदिर उघडल्यानंतर मंदिरात अजूनही गेली नाहीत, असा टोला भाजपच्या नेत्यांना नाव न घेता भुजबळ यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : सूडबुद्धीने वागणारे सत्ता उबवू शकतात, पण राष्ट्र चालवू शकत नाहीत’ – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER