इतिहासात भर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशाच्या अज्ञात शाखेचा शोध

Maharashtra Today

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज(of Chhatrapati Shivaji Maharaj’s ) यांच्या एका अज्ञात शाखेचा शोध ऐतिहासिक कागदपत्रांमधून लागला आहे. शिवाजी महाराज यांना दोन मुले झाली, पहिले संभाजी राजे आणि दुसरे राजाराम महाराज, हे सर्वांना माहीत आहेत.मात्र, या व्यतिरीक्तच्या अज्ञात शाखेचा उलगडा ‘शिववंश’ (Shivvansh)या पुस्तकातून होणार असल्याचा दावा पुण्यातील संशोधकांनी केला आहे.

पत्रकार परिषद घेऊन या विषयची माहिती देण्यात आली. या सर्व इतिहासाची माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने या शाखांचा समग्र इतिहास आणि विवेंचन शिववंश या संशोधन ग्रंथाद्वारे प्रकाशित होणार आहे. न्यू ईरा पब्लिकेशन(New Era Publication) ही प्रकाशन संस्था हे पुस्तक प्रकाशित करणार आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत करणसिंह बांदल.

पत्र परिषदेत शिववंशच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले. बांदल यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी राजे यांचे दोन विवाह झाले. पहिला विवाह राजेशिर्के घराण्यातील येसुबाई यांच्या सोबतचा. त्यांच्या पासून शिवाजी राजे उर्फ छत्रपती शाहू (थोरले) यांचा जन्म झाला. हे सर्वांना माहीत आहे. त्यांचा दुसरा विवाह जाधवराव घराण्यातील दुर्गाबाई यांच्याशी १६७५ साली झाला. हा विवाह शिवाजी महाराज यांच्या समक्ष झाला होता. या विवाहातून चार अपत्ये जन्मास आली. त्यात दोन मुले व दोन मुली होत्या, त्यातील मुलांची नावे अनुक्रमे मदनसिंह आणि माधवसिंह अशी होती. मुलींच्या नावाबद्दल जास्त उल्लेख आढळत नाही.

छत्रपती संभाजी राजे यांच्या मृत्यूनंतर रायगड किल्ल्याचा पडाव झाला व राजकबिला कैदेत सापडला. त्यामध्ये छत्रपती शाहू राजे (थोरले), मदनसिंह, माधवसिंह, सकवारबाई, येसूबाई व दुर्गाबाई यांचा समावेश असल्याचे संदर्भ आहेत. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराज महाराष्ट्रात आले. शाहूनी १७१९ साली दिल्ली मोहीम आखली व राजकबिल्याची सुटका झाली. त्यामध्ये मदनसिंह होते. १६९८ साली माधवसिंह यांचा मृत्यू झाला होता. मदनसिंह यांना दोन अपत्य झाली त्यांची नावे संभासिंह व रुपसिंह होती, असे बांदल यांनी सांगितले. हा सर्व इतिहास बांदल यांनी शिववंश या पुस्तकात मांडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button