अ‍ॅड. जयश्री पाटलांमुळे मराठा समाजाची बदनामी; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

Maharashtra Today

मुंबई :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात अ‍ॅड. जयश्री पाटील (Jayashree Patil) यांनी याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने सीबीआय तपासाचा आदेश दिला. याप्रकरणी जयश्री पाटील यांनी मराठा समाजाची बदनामी केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha)केला आहे.

याचिकाकर्त्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मराठा समाजाची बदनामी केली आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून केला जात आहे. बदनामी केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने परिपत्रक जारीकरून दिला आहे. कोर्टात निकाल लागताच अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा बोलवता धनी कोण, याचाही खुलासा करणार, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. याबाबत परमबीर सिंग यांनी कोर्टात याचिका दाखल करून केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे वर्ग केले. त्याचवेळी अ‍ॅड. जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करून अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली.

अ‍ॅड. जयश्री पाटील काय म्हणाल्या?

“अनिल देशमुख तुम्ही पॉवरफुल मराठा नेते असाल, शरद पवारांचे तुमच्यावर वरदहस्त असाल, तरी तुम्ही कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा मोठे नाही. भलेही तुम्ही माझं नाव पोलीस डायरीत येऊ दिलं नाही. सरन्यायाधीशांनी म्हटलंय, यांचं नाव डायरीत का नाही, हे दबावतंत्र आहे. शरद पवारांकडून हा दबाव आणलाय.” असे अ‍ॅड. जयश्री पाटील निकालानंतर म्हणाल्या.

जयश्री पाटील कोण?

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्याकरवी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली. त्यानंतर जयश्री पाटील यांनी हायकोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या त्या कन्या आहेत. जयश्री यांनी राज्य सरकारच्या मानवाधिकार आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुखपदी सात वर्षे काम पाहिले. त्यांनी मानवाधिकारांबाबत अनेक पुस्तके लिहिली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button