आदर्श : कऱ्हाडच्या नगराध्यक्षांनी केले कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार !

Rohini Shinde.jpg

कराड :- कोरोना रुग्णांच्या शवांवर अंत्यसंस्कार करण्याऱ्या नपच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कऱ्हाडच्या  नगराध्यक्ष रोहिणी शिंदे (Rohini Shinde) यांनी  कर्मचाऱ्यांसोबत या कामात भाग घेतला. मी तुमच्यासोबत आहे, असा संदेश दिला.

कोरोना (Corona) काळात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कोरोनाच्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराची मोठी जबाबदारी आहे. गेल्या काही महिन्यांत  मोठ्या संख्येत कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा मानसिक ताण वाढला आहे. या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कऱ्हाड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांनी पीपीई किट घालून कोरोनाच्या रुग्णांवर अंत्यसंस्कार केले.

यामुळे कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या ‘कोविड योद्धा’ कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढले आहे. त्यांनी नगराध्यक्षांचे आभार मानले. या रणरागिणीचा सर्व  कऱ्हाडकरांना अभिमान असल्याच्या प्रतिक्रिया कऱ्हाडमधून व्यक्त होत आहेत.

कऱ्हाड  नगरपालिकेचे कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून सतत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करत आहेत. त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक ताण असल्याने या कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळावी, त्यांचे मनोबल वाढावे यासाठी नगराध्यक्षांनी स्मशानभूमीत हे पाऊल उचलले.

कोरोना काळात असे प्रेरणादायी काम करणाऱ्या त्या राज्यातील एकमेव नगराध्यक्ष असाव्यात. त्या सुरुवातीपासून कोरोनाविरोधातील लढ्यात आघाडीवर आहेत. लॉकडाऊन काळात थेट जनतेत असल्याने त्याही कोरोनाबाधित झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात करून पुन्हा  कऱ्हाडकरांच्या सेवेत हजर झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER