आदर पूनावालाच्या सीरमने लसीच्या व्यवसायासाठी यूकेमध्ये केली २४० दशलक्ष पाउंडची गुंतवणूक

serum institute of india - Maharashtra Today

मुंबई :- देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आधीच दुसऱ्या टप्प्यातील नागरिकांना लस मिळत नसताना तिसऱ्या टप्प्यातील म्हणजेच १८ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लस पुरविण्यावरून केंद्र सरकार आणि कंपन्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. यातच सीरमचे आदर पूनावाला (Adar Poonawalla) हे धमक्या मिळत असल्याने ब्रिटनमध्ये सहकुटुंब गेले आहेत. अशातच पूनावाला यांनी ब्रिटनमध्ये लसींचा व्यवसाय सुरू केल्याची माहिती आहे.

ब्रिटनच्या सरकारने यूके इंडिया ट्रेड डील अंतर्गत मोठी घोषणा केली आहे. एक अब्ज पाउंडच्या या डीलमुळे देशात ६५०० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यांच्यानुसार सीरमने यूकेमध्ये लसीच्या व्यवसायासाठी २४० दशलक्ष पाउंडची गुंतवणूक केली आहे. यानुसार नवीन सेल्स ऑफिस उघडले जाणार आहे.

सौजन्य :- NDTV.com

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button