अखेर कष्टाचे चीज झाले; अदर पूनावाला यांनी ट्विट करून व्यक्त केला आनंद

Adar Poonawala

मुंबई : कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रभावी शस्त्र असलेली लस आता भारतातही लवकरच उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने रविवारी सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) आणि भारत बायोटेक या दोन औषध निर्माण कंपन्यांच्या लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. त्यांची घोषणा ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था) आज केली.

कोविशिल्ड लसीला मंजुरी देण्यात आल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे  सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला- “सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. लस संकलनासाठी सीरम इन्स्टिट्यूट  ऑफ इंडियाने पत्करलेल्या सर्व अडचणींना अखेर यश मिळालं. कोरोनावरील भारताच्या पहिली लस असलेल्या कोविशिल्डला मंजुरी मिळाली आहे. ही लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे आणि पुढील काही आठवड्यात लोकांना देण्यासाठी तयार आहे, असे सांगत पूनावाला यांनी आपल्या आनंदी भावना व्यक्त केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER