देशभर लस पोहोचल्यानंतर आदर पुनावालांनी साजरा केला 40 वा वाढदिवस

adar-poonawala

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांचा 40 वा वाढदिवस नुकताच धुमधडाक्यात पार पडला. कोरोना काळात दिवस रात्र काम करणारे आदर पूनावाला वाढदिवसादिवशी मात्र रिलॅक्स अंदाजात दिसून आले. त्यांची पत्नी तनाशा पूनावाला यांनी त्यांच्या वाढदिवसाची खास इन्स्टाग्रावर पोस्ट केली आहे.

वर्षभर ज्या कोरोनाने जगाला बंदिस्त केलं त्या कोरोनाच्या तावडीतून सोडवण्यासाठी ‘खास लस’ पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने बनवलीय. आठवड्याभरापूर्वीच कोरोना लसींचे वितरण संपूर्ण देशभरात झालं. आता कुठे पूनावाला रिलॅक्स झाले आहेत. काल परवा आदर पूनावाला यांनी वयाची 40 वर्ष पूर्ण करुन 41 व्या वर्षात पदार्पण केलं. त्यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत केलं.

आदर पूनावाला यांच्या पत्नी नताशा यांनी इन्स्टाग्रामवर आदर यांच्या वाढदिवसासंबंधीची पोस्ट केली आहे. पोस्ट केलेल्या फोटोत स्वत: आदर पूनावाला, पत्नी नताशा पूनावाला, आदर यांची दोन छोटी मुलं, आदर यांचे वडिल सायरस पूनावाला हे दिसून येत आहेत.

“माझ्या पॉवरहाऊसला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…”

“पॉवरहाऊसला वाढदिवसाच्या शूप साऱ्या शुभेच्छा… माझा रॉक आदर… आनंद साजरा करण्यासाठी काही क्षण एकत्र आलोय.. ज्या क्षणांची वाट आम्ही पाहत होतो तो क्षण यायला काही महिन्यांचं परिश्रम लागले आहेत. अजूनही काही माईलस्टोन गाठायचे आहेत. आशा आहे ते गाठल्यानंतर नक्की चांगली झोप येईल….”, अशी खास इन्स्टाग्रावर पोस्ट त्यांची पत्नी तनाशा पूनावाला यांनी लिहिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER