लग्न झालेले पुरुषच आवडतात नायिकांना?

Hindi cinema heroines

हिंदी चित्रपटसृष्टीतील नायिका म्हणजे कोट्यवधी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या नायिका. त्यांचे कोट्यवधी प्रशंसक असतात. यात अनेक श्रीमंत तरुणांचाही समावेश असतो. असे असतानाही आघाडीच्या नायिकांनी अगोदरच लग्न झालेल्यांबरोबर संसार थाटून सगळ्यांनाच आश्चर्याचे धक्के दिले आहेत.

अशा नायिकांचा विचार सुरू केला असता सगळ्यात अगोदर डोळ्यांसमोर नाव येते ते ड्रीम गर्ल हेमा मालिनीचे. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र या जोडीचे. या दोघांची प्रेमकथा एखाद्या चित्रपटाप्रमाणेच आहे. हेमा मालिनीसोबत लग्न करण्यास संजीव कुमार, जितेंद्र तयार होते; परंतु हेमा मालिनीने दोन मुलांचा बाप असलेल्या धर्मेंद्रबरोबर लग्न केले. धर्मेंद्र आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यास तयार नसल्याने दोघांनी लग्नासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि लग्न केले. आजही हे दांपत्य सुखाने नांदत आहे. हेमाच्या दोन्ही मुलींची लग्नेही झाली आहेत.

श्रीदेवी तर कोट्यवधींच्या हृदयाची राणी. तिच्या एक इशाऱ्यावर कोणीही तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले असते. परंतु श्रीदेवी लग्न झालेल्या मिथुनच्या प्रेमात पडली. दोघांनी लग्न केल्याचेही बोलले जाते. मात्र काही वर्षांतच दोघे वेगळे झाले आणि श्रीदेवीने निर्माता बोनी कपूरला साथीदार निवडले. बोनी कपूरचे अगोदरच लग्न झालेले होते आणि त्याला दोन मुले अर्जुन आणि अंशुल होती. गरोदर राहिल्याने श्रीदेवी आणि बोनी कपूरने लगेचच लग्न केले. लग्नानंतर श्रीदेवीला जान्हवी आणि खुशी अशा दोन मुली झाल्या. सध्या जान्हवी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणून कारकीर्द घडवत आहे.

राणी मुखर्जी. नावाप्रमाणेच राणी अनेकांच्या हृदयाची राणी होती. परंतु राणीने यशराज फिल्म्सचे सर्वेसर्वा आदित्य चोप्राबरोबर लग्न केले. आदित्यचे अगोदरच लग्न झाले होते. त्या पत्नीचे नाव पायल; परंतु मूल होत नसल्याने दोघांमध्ये भांडण सुरू झाले. त्याच वेळेस आदित्य आणि राणी एकत्र आले. आदित्यने पायलला घटस्फोट दिला आणि राणीशी लग्न केले.

आपल्या अवखळ हास्याने सगळ्यांना वेड लावणाऱ्या जुही चावलानेही उद्योगपती जय मेहतासोबत गुपचूप लग्न केले. जय मेहताचे अगोदर यश बिर्लाच्या बहिणीशी सुजाताशी लग्न झाले होते. मात्र तिचे एका विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर जय मेहता एकटाच होता. १९९५ मध्ये जुही आणि जय मेहताने लग्न केले. त्यांना आता दोन मुले आहेत.

विद्या बालनही अगोदरच दोन लग्न केलेल्या सिद्धार्थ रॉय कपूरबरोबर लग्न करून सगळ्यांनाच चकित केले होते. सिद्धार्थचे पहिले लग्न त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीबरोबर झाले होेते. परंतु काही कारणाने हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर सिद्धार्थने एका मालिका निर्मात्रीबरोबर लग्न केले. परंतु हे लग्नही फार काळ टिकले नाही. त्यानंतर सिद्धार्थ ऱय कपूरने विद्या बालनशी लग्न केले.

करीना कपूरने तर तिच्यापेक्षा 10 वर्ष मोठ्या आणि दोन मुलांचा बाप असलेल्या सैफ अलीबरोबर लग्न करून सगळ्यांना चकित केले होते. आता करीना दुसऱ्यांदा गरोदर आहे. सैफने अमृता सिंहबरोबर लग्न केले होेते. त्यांना दोन मुले सारा आणि इब्राहिम आहेत. सारा आता नायिका झाली असून इबारहिमही लवकरच नायक म्हणून रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

शिल्पा शेट्टीनेही प्रख्यात व्यावसायिक राज कुंद्रासोबत लग्न केले. राज कुंद्राचे पहिले लग्न कविता नावाच्या मुलीसोबत झाले होते. परंतु ते लग्न फार काळ टिकले नाही.

त्यांनी घटस्फोट घेतला. परंतु या घटस्फोटाचे कारण शिल्पा शेट्टीच सांगितले जाते. शिल्पा आणि राजमध्ये जवळीक वाढत असल्याचे कविताला समजले होते आणि त्यामुळे दोघांमध्ये भांडणे होत होती. कविताला घटस्फोट दिल्यानंतर राजने शिल्पाशी लग्न केले. त्यांना विवान नावाचा एक मुलगा आहे.

याशिवाय जयाप्रदा, शबाना आझमी यांनीही अगोदरच लग्न झालेल्या पुरुषांबरोबर लग्ने केलेली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER