अभिनेत्री विजयशांती काँग्रेस सोडून भाजपात येणार

Congress Vijaya Shanti

हैदराबाद : काँग्रेसच्या (Congress) नेत्या व अभिनेत्री विजयशांती (Congress Senior Leader & Actress Vijayshanti) लवकरच भाजपात (BJP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजयशांती काही दिवसांपासून काँग्रेसच्या कार्यक्रमांना आणि बैठकांना उपस्थित राहत नाहीत.

विजयशांती भाजपात आल्या तर त्या दक्षिण भारतामधून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या दुसऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री असतील. या आधी अभिनेत्री खुशबू यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला आहे.

विजयशांती यांच्या भाजपा प्रवेशामुळे हैदराबादमधील स्थानिक निवडणुकांमध्ये (Greater Hyderabad Municipal Corporation Election) चुरस वाढणार आहे. या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार आहेत. विजयशांती यांनी भाजपात प्रवेश करून राजकीय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकले होते. नंतर त्यांनी टीआरएस (TRS) मध्ये प्रवेश केला होता. तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर २०१४ साली विजयशांती काँग्रेससोबत गेल्या.

काँग्रेसमध्ये मिळणाऱ्या वागणुकीमुळे त्या नाराज होत्या. अमित शाह आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे. विजयशांती यांच्यासोबत अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे.

हैदराबादमधील स्थानिक निवडणुका १ डिसेंबरमध्ये होणार आहेत आणि ४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER