
मुंबई :- राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडक (Urmila Matondkar) ‘मातोश्री’वर अधिकृत पक्षप्रवेश करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्या पक्षप्रवेश करतील .
उर्मिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर दुपारी 1 वाजता हाती शिवबंधन बांधेल. त्यानंतर दुपारी 4 वाजता उर्मिला पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत उर्मिला मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकरचं नाव देण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला शिवबंधन हाती बांधणार आहे.
ही बातमी पण वाचा : ऊर्मिला मातोंडकर आज शिवबंधन बांधणार? सस्पेन्स कायम
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला