
मुंबई :- राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना (Shiv Sena) उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi), महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत होत्या .
विधान परिषदेत शिवसेनेचा आवाज उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने अधिक बुलंद होणार आहे.
दरम्यान उर्मिला यांचा भगवा मास्क यावेळी लक्षवेधी ठरला. शिवसेनेत प्रवेशानंतर उर्मिला दुपारी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती आहे .
अभिनेत्री @UrmilaMatondkar जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/lAv21HjbaH
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) December 1, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला