
मुंबई : शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) रक्तदान शिबिरात सहभागी होणार आहेत.
महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्त्वाचा स्त्रोत आहे. मात्र, कोव्हिड 19 च्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये बंद आहेत. तसेच रक्तदानात अग्रेसर असणाऱ्या बऱ्याच मोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांच्याकडून वर्क फ्रॉम होम सुरु असल्यामुळे रक्त संकलनामध्ये अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले . त्याच आवाहनाला उर्मिला यांनी प्रतिसाद दिला आहे .
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोना संकट काळात खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं. ते सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत. आपुलकीने सर्वांशी बोलत आहेत. घरातील कुटुंबप्रमुखाप्रमाणे ते सर्वांना समजवतात. त्यांनी ज्याप्रकारे महाराष्ट्राला सांभाळलं त्याने मी प्रभावित झाली आहे. अशा नेतृत्वासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे , अशी प्रतिक्रिया उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला