अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सांगितले बालपणाचे किस्से; पालकांच्या घटस्फोटामुळे लोकांनी आपल्या मुलांना माझ्यापासून दूर ठेवले

Behensplaining Renuka Rahane

पालकांमधील घटस्फोटाचा परिणाम सामान्यत: त्यांच्या मुलांवर होतो. विशेषत: मुले लहान असल्यास त्यांच्या पालनपोषणावर परिणाम होतो आणि त्यांच्यात नकारात्मकता भरण्याची भीती असते. अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांनीही अगदी लहान वयातच त्यांच्या पालकांच्या घटस्फोटाबद्दल असेच म्हटले आहे. रेणुका शहाणे सांगतात की, आईवडिलांनी जेव्हा मी आठ वर्षांची होते तेव्हाच घटस्फोट घेतलेला. त्याचा प्रभाव माझ्या आयुष्यावर खूप खोलवर होता. मी एका तुटलेल्या कुटुंबातून येत होते म्हणून लोकांनी त्यांच्या मुलांना माझ्याबरोबर खेळू दिले नाही.

नेटफ्लिक्सच्या बेनस्प्लेनिंग (Behensplaining) मधील एका विशेष भागात रेणुका शहाणे म्हणाल्या, “जेव्हा लोक त्यांच्या मुलांना खेळण्यापासून रोखायचे तेव्हा मी अस्वस्थ व्हायची. जेव्हा मी फक्त आठ वर्षांचे होते तेव्हा माझे पालक वेगळे झाले. लोक आमच्याकडे बघत असत आणि असे म्हणत असत की, तू  घटस्फोटित कुटुंबातली  आहेस. लोक त्यांच्या मुलांनाही माझ्याशी खेळू नका असे सांगत असत; कारण ती तुटलेल्या कुटुंबातून आली आहे. लोकांना असे वाटत होते की, जर ते माझ्याबरोबर खेळतील तर मग त्यांचे  कुटुंबही तुटेल.”

रेणुका शहाणे यांनी  नुकतीच दिग्दर्शनाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. काजोलच्या मुख्य भूमिकेसह त्यांनी ‘त्रिभंगा’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात काजोलव्यतिरिक्त तन्वी आझमी आणि मिथिला पालकर ह्यासुद्धा आहेत. हा चित्रपट तीन पिढ्यांच्या महिलांमधील संबंधांची कहाणी आहे.

हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात काजोलने एका ओडिसी नर्तकची भूमिका साकारली आहे. यापूर्वी तिने सर्कस, सुरभी आणि सैलाबसारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. इतकेच नाही तर रेणुका शहाणेने ‘हम आपके हैं कौन’ मध्ये काम केले आणि एका काळात अभिनय केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER